मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (2 जानेवारी) पत्रकार परिषदेत पुन्हा एनसीबी अधिकारी आणि मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंवरही (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले. यात, एनसीबी अधिकारी मागील काही प्रकरणांत पंचांवर दबाव टाकून त्यांच्या पंचनाम्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या जात असल्याचा आरोप केला असून याचवेळी त्यांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या.
काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलच नवाब मलिक यांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या. या क्लिपमध्ये मॅडी नावाच्या पंचाला एनसीबीच्या किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला. एका मागील प्रकरणाच्या पंचनाम्यावर सही करण्यास सांगत आहे. तसेच हा पंचनामा आमच्या समक्ष पंचनामा झाला आहे, कारवाईची प्रक्रियाही झाली असल्याचे संबंधित अधिकारी मॅडीला सांगत आहे. अधिकाऱ्याच्या बोलण्याने मॅडी घाबरून जातो. त्यानंतर मलिक यांनी ऐकवलेल्या दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये समीर वानखेडे आणि पंचाचे संभाषण आहे. यातही समीर वानखेडे मागच्या एका प्रकरणात मॅडीला बिनधास्त पंचनाम्यावर सही करण्यास सांगत आहे.
त्यानंतर नवाब मलिकांनी एनसीबीकडून कशा प्रकारे बोगस कारवाया केल्या जातात हे त्यांनी सांगितले. पंचनामा बदलण्यासाठी पंचांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय. यावेळी वानखेडे यांना कार्यकाळ वाढवून देण्यात यावा यासाठी महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरू केल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्यात गेल्या वर्षभरापासून खोट्या केसेस दाखल करुन वसुली केली. या वसुली प्रकरणात भाजपचा देखील हिस्सा आहे. असे म्हणत नवाब मलिक यांनी मी काही प्रकरणांत दिलेल्या माहितीचं काय झालं? तपासासाठी जी एसआयटी समिती नेमण्यात आली होती, त्या समितीने कोणते अहवाल दिले, असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
मी 'फर्जीवाडा' उघड करत आहे, तर वेगवेगळ्या माध्यमातून मला बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबाबत मी न्यायालयातच बोलेन, पण एनसीबी आणि केंद्रीय तपास यंत्रणा काही चुकीचं काम करत असतील तर, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे मलिक म्हणाले.
त्याचवेळी, आता एनसीबी समीर वानखेडेंवर काय कारवाई करणार, असा सवालही त्यांनी केला. समीर वानखेडे (खान) यांचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केल्याची माहिती मला मिळाली, पण फक्त समीर खानच्या जामीनाविरोधातच अर्ज का केला गेला, त्यांच्यासोबत आणखी सहा आरोपीदेखील आहेत, त्यांचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला. तसेच, समीर वानखेडेंचा कार्यकाळ वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत लॉबिंग सुरू केली आहे, असा दावाही मलिक यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.