मुंबई

नवाब मलिकांचे पुन्हा सूचक ट्विट, 'मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते!'

सोशल मिडीयावर होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे हैरान झालेल्या समीर वानखेडेंच्या वडिलांनी कोर्टात धाव घेत मलिकांच्या विरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP spokesperson Nawab Malik) यांच्याविरोधात एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wanakhede) यांच्या वडिलांनी ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक दररोज सोशल मिडीयाद्वारे पोस्ट टाकत आपली बदनामी करत आहेत. त्यामुळे त्यांना सोशल मिडीयावर पोस्ट टाकण्यास मनाई करण्याचे आदेश देण्याची विनंतीही वानखेडे यांनी केली आहे. तर न्यायालयानेही वानखेडे यांच्या आरोपांवर उद्या (१० नोव्हेंबर) उत्तर देण्याचे आदेश नवाब मलिक यांच्या वकिलांना दिले आहेत.

मात्र एकीकडे न्यायालयाने उत्तर देण्याचे आदेश दिले असतानाच मलिकांचे सोशल मिडीयावरुन वानखेडेंना टार्गेट करण्याचे सत्र सुरु असल्याचे दिसत आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक सूचक ट्विट करत वानखेडेंना इशारा दिला आहे. 'ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते !' म्हणजे माझं बोलणं बंद करुन तूम्ही माझ्या ध्येयाला आणि लढ्याला रोखू शकत नाही, असं नवाब मलिक यांना सुचवायचं आहे.

नवाब मलिक गेल्या महिनाभरापासून एनसीबी, समीर वानखेडे आणि ड्रग्ज संदर्भातील कारवायांवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. त्यानंतर त्यांनी ट्विटची मालिका सुरु केली. सोशल मिडीयावर होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे हैरान झालेल्या समीर वानखेडेंच्या वडिलांनी कोर्टात धाव घेत मलिकांच्या विरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा दाखल केला. तर न्यायालयानेही नवाब मलिक यांना आज त्यांची भूमिका मांडण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक आज त्यांच्या भुमिकांवर काय बोलणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ज्ञानदेव वानखेडे यांच्या याचिकेवर काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. ज्ञानेश्वर वानखेडे यांचे वकील अशरफ शेख यांनी वानखेडे यांनी युक्तीवाद केला. नवाब मलिक सोशल मिडीयाच्या माध्यमातून सातत्याने ज्ञानेश्वर वानखडे आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत पोस्ट करत त्यांची बदनामी करत आहेत, अस अशरफ शेख यांनी न्यायालयात सांगितल. मात्र त्यावर आम्ही 15 दिवसात आमचे उत्तर देऊ. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती नवाब मलिकांचे वकील अतूल दामले यांनी केली.

मात्र मलिक यांनी क्रांती रेडकर यांच्या बहिणीबाबत एक पोस्ट केली असल्याचे शेख यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतंर न्यायालयानेही याबाबत उद्याच रिप्लाय दाखल करण्याचे आदेश दिले. आता उद्या( 10 नोव्हेंबर) या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, नवाब मलिकांना सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्याचे कोणतेही निर्बंध न्यायालयाने लावलेले नाहीत. त्यामुळे नबाव मलिकांनी आपल्या ट्विटची मालिका सुरुच ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT