Ajit Pawar sarkarnama
मुंबई

अजितदादांनी मोदी सरकारकडे केली 'ही' मागणी

अनेक वर्षानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे आज माळेगाव साखर कारखान्यावर (Malegaon Sugar Factory)आले होते.

सरकारनामा ब्युरो

बारामती : ''गुजरातमध्ये आपल्या पेक्षा 300 रुपये उसाला जास्त दर आहे. केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री वाढवली पाहिजे,'' अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दसऱ्यानिमित्त पूजन करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. अनेक वर्षानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे आज माळेगाव साखर कारखान्यावर (Malegaon Sugar Factory)आले होते.

अजित पवार म्हणाले, '' यंदा पाऊस चांगला झाला आहे. यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. राज्यातील सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. पाठीमागच्या सरकारने आपलं पाणी कमी केले होते. पण आपले सरकार आल्याने ते पाणी पुन्हा मिळवता आले. साखरेच्या पोत्यावर प्रतिदिन 1 रुपया व्याज पडते. 20 हजार क्यूटल साखर री प्रोसेस करावी लागणार आहे.'' ''ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे दर चांगले आहेत. नीट शेती करा ऊसाचे पीक दर्जेदार घ्या,'' असे अजित पवार म्हणाले.

काल सोमश्वर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल लागला. 'इतक्या प्रचंड मतांनी माझा पॅनेल निवडून द्या की मतांच्या ओझ्याने मी वाकलो पाहिजे' हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांनी शब्दशः खरे केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती सोमेश्वरच्या सभासदांनी केली असून सुमारे सोळा हजारांच्या भव्यदिव्य फरकाने विजयश्री बहाल करत सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे.

दरम्यान, यानिमित्ताने ‘भाजप’चा कारखान्याच्या निवडणुकीत थेटपणे प्रथमच प्रवेश झाला असून पराभव निश्चित असतानाही लढाईत उतरून विरोधकांची भूमिका वठविली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर विकास पॅनेल राज्यातील आजवरच्या सर्वात अभूतपूर्व विजयाच्या दिशेने घौडदौड करीत आहे. पवार यांनी सलग सातव्यांदा कारखान्यावर आपले एकहाती वर्चस्व राखले आहे

मोठा निर्णय : प्रत्येक पोलिस शिपाई आता फौजदार म्हणून निवृत्त होणार

मुंबई : निशस्त्र पोलिस शिपाई पदावरील अंमलदारांना पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या गृहविभागातील बैठकीत हा निर्णय झाला आहे. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT