Anil Deshmukh Sarkarnama
मुंबई

Big Breaking : Anil Deshmukh यांचा कारागृहातील मुक्काम वाढला.. ; सीबीआयची उच्च न्यायालयात धाव

Anil Deshmukh Breaking News: १ लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

Money laundering case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला होता, पण सीबीआय उच्च न्यायालयात दाद मागणार असल्यामुळे त्यांच्या जामीनाला दहा दिवसांची स्थगिती न्यायालयाने दिली आहे. १ लाखाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अनिल देशमुख मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहेत. अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. ईडीने त्यांना जामीन मंजूर केला आहे. आज सीबीआयच्या प्रकरणात जामीनावर सुनावणी झाली.

सीबीआयने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी 8 दिवसांची मागणी केली होती, न्यायालयाने या निर्णयाला 10 दिवसांची स्थगिती दिली आहे.

अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. अनिल देशमुख यांना जामीन मिळल्याची बातमी मिळताच त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांना जल्लोष केला, पण जामीनासाठी दहा दिवसांची स्थगिती देण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले.

काही दिवसापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कोर्टात हजर राहावे, अशी अट घातली होती.

त्यामुळे ऋषिकेश देशमुख कोर्टात हजर होते. कोर्टाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर कोर्टाने ऋषिकेश देशमुख यांना समन्स बजावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT