NCP Crisis Sarkarnama
मुंबई

NCP Minister Meet Sharad Pawar : मोठी बातमी : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : अजित पवार गटाचे सर्व नेते हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. सेंटरवर दाखल झाले आहेत. (NCP Minister Meet Sharad Pawar News Update)

अजित पवार , छगन भुजबळ,अदिती तटकरे, हसन मुश्रीफ मंत्री, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, संजय बनसोडे आदी मंत्री वाय.बी सेंटरवर पोहचले आहेत.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हेही वाय.बी. सेंटरला पोहचले आहेत. "मला सुप्रिया ताईंचा फोन आला की ताबडतोब वाय.बी. सेंटर या. म्हणून मी येथे आलो आहे," असे जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. यावेळी जयंत पाटलांनी अधिक बोलण्याचे टाळलं.

उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. दोन्ही गटाकडे किती आमदार आहेत, हा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT