Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : ...म्हणून अनिल देशमुख आमच्यासोबत आले नाहीत; अजितदादांनी गौप्यस्फोट करत सगळंच सांगून टाकलं

Anil Deshmukh : २०१४ ला निवडणूक झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी कुणाला बाहेरून पाठिंबा दिला होता ?

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. आमच्यासोबत अनिल देशमुख हेसुद्धा येण्यासाठी तयार होते. मात्र, भाजपने भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांनी येण्यास नकार दिला, असे सांगून अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला. दोनदिवसीय निर्धार शिबिरानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी देशमुखांबाबत घडलेला किस्सा सांगितला.

भाजपने होकार दिला असता तर आज अनिल देशमुख आमच्यासोबत असते, अशा आशयाचे विधान करत अजित पवारांनी झालेला घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, अनिल देशमुखही माझ्याबरोबर होते. ते सर्व बैठकांना हजर होते. त्यांनी मात्र मंत्रिपदाची अट ठेवली होती. त्यानुसार यादीही भाजपकडे दिली होती. मात्र, भाजपने त्यांच्या नावाला आक्षेप घेतला, असे त्यांनी सांगितले.

अनिल देशमुखांना मंत्री व्हायचे होते. मात्र, ते शक्य झाले नाही. याबाबत अजित पवार म्हणाले, आमच्या यादीवर भाजपने सांगितले, की तुमच्या मंत्रिमंडळाची यादी आलेली आहे. देशमुखांबाबत आम्ही सभागृहात बरेच आरोप केलेले आहेत. असे असताना त्यांना लगेच मंत्रिमंडळात सहभागी करून घेणे शक्य नाही. तसे झाले तर आमच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेता येणार नाही. भाजपने असे कळविल्यानंतर देशमुखांचे नाव कमी झाले. त्यावर ते म्हणाले, की मला मंत्रिपद नाही तर मी तुमच्या बरोबर नाही. हे स्पष्ट आहे. काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असे ठणकावूनच अजितदादांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी आम्ही कुठलीही वेगळी भूमिका घेतली नसल्याचा दावाही पवारांनी केला. ते म्हणाले, '२०१४ ला निवडणूक झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी कुणाला बाहेरून पाठिंबा दिला होता. तो भाजप म्हणजे भारतीय जनता पक्षाला दिला होता. त्यामुळेच ते सरकार आले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी आम्ही तटस्थ राहिलाे. तटस्थ म्हणजे एक प्रकारची भाजपला मदतच होती ना.. यानंतरही त्यांनी भाजपसोबत जाण्यासाठी काय काय केले, याची माहिती सर्वांनाच आहे. '

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT