NCP Crisis News Sarkarnama
मुंबई

NCP Crisis : तब्बल 260 पानांचं उत्तर, अजित पवार गटाचा पुन्हा 'राष्ट्रवादी'वर दावा, म्हणाले...

Sharad Pawar vs Ajit Pawar : 'राष्ट्रवादी पक्ष आमचाच' अजित पवार गटाने पुन्हा केला दावा

Sudesh Mitkar

Mumbai News : पक्षशिस्त मोडल्याने आमदारांना अपात्र का करू नये, अशी याचिका अजित पवार गटाने विधिमंडळात दाखल केली आहे. त्यानंतर पक्षविरोधी कृती केल्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांवर कारवाई करा. त्यांना अपात्र ठरवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. या नोटिशीला अजित पवार गटाकडून 260 पानी उत्तर सादर करण्यात आले आहे. या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष आमचाच आहे, असा दावा अजित पवार गटाने केला आहे.

राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर अजित पवार गटाकडून विधिमंडळात अपात्रतेच्या नोटिसांबाबत उत्तर सादर करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी आमदारांचे बहुमत आमच्याकडे असल्यामुळे आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे नोटिशीला उत्तर देताना अजित पवार गटाने ही भूमिका मांडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्यासोबत असल्याने मूळ राष्ट्रवादी पक्ष आमचाच असल्याची भूमिका ठामपणे मांडली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तत्काळ निर्णय घ्यावा, अशी भूमिका अजित पवार गटांची आहे.

तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांनादेखील अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती. त्यातला शरद पवार गटातील आमदारांनी 10 पानी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय घेण्याचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे, तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेबाबत अंतिम निर्णय 31 डिसेंबरपर्यंत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेची सुनावणी आता नियमित सुरू आहे. आता याबाबत नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.

(Edited by Sudesh Mitkar)

अजित पवार गट भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत फुट पडली आहे . त्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर दावा केला आहे. यामुळे शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलं आहे. त्यामुळे याबाबत सुरू असलेल्या सुनावणीकडेसर्वांचेच लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT