Jayant Patil News, Political Crisis in Maharashtra, NCP News sarkarnama
मुंबई

आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न ; राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर नेमकं राज्यात काय होणार याच्या विविध प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

सरकारानामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्याच्या वेगळं वळण लागलं आहे. गेल्या दोन दिवसापासून विविध घडामोंडी होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. (Jayant Patil News in Marathi)

याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांना माहिती दिली. यावेळी पवारांनी राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्यांना आणि आमदारांना आदेश दिला असल्याचे पाटील यांनी सांगितले. (Political Crisis in Maharashtra)

'महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करा,' असे पवार यांनी सांगितले असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. "शिवसेनेच्या अंतर्गत काय सुरु आहे, याची मला माहिती नाही, राष्ट्रवादीचे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना सहकार्य करतील. राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत असेल," असे जयंत पाटील म्हणाले.

"मुंबईतील शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला जाणार नाहीत,असं वाटतं होते. ते फुटतील अशी अपेक्षा नव्हती. काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद नाही," असे जयंत पाटील म्हणाले.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवत एकनाथ शिंदेंनी थेट मातोश्रीलाच आव्हान दिले आहे. शिवसेनेतील ३० ते ४० आमदारांना स्वतःच्या गटात ओढत एकनाथ शिंदेंनी शिवसेनाला भगदाड पाडलं. त्यामुळे ठाकरे सरकारचं संकटात आहे.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर नेमकं राज्यात काय होणार याच्या विविध प्रकारच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त होणार का ? भाजप पुन्हा सत्तेत येणार का? बंडखोर आमदारांवर कारवाई होणार का हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. येत्या दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT