Jitendra Awhad Latest News Updates, Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raid case, Jitendra Awhad on ED Raid case News  sarkarnama
मुंबई

जितेंद्र आव्हाडांना ईडीचा धसका ; म्हणाले, ''मी आत्महत्या करेल,''

गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड हे देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांना मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडीने (ED)जोरदार झटका दिला. ईडीने पाटणकर यांचे ठाण्यातील कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट्स जप्त केले. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ''चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. (Jitendra Awhad on Shridhar Patankar ED Raid case)

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला असल्याचे त्यांच्या या विधानावरुन दिसते. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या काही नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड हे देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांना अशा कोणत्या कारवाईची चाहुल लागली आहे का? याच उद्विग्नतेमधून त्यांनी हे वक्तव्य केले का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ईडीच्या कारवाईसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आव्हाडांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हे विधान केलं आहे. ते म्हणाले, ''चौकशीला बोलवलं तरी, माझी मुलगी आत्महत्या करेल, मी काही चुका वगैरे केल्या नाहीत. पण काही सांगता येत नाही वरच्या टेपिंग-बिपिंगमध्ये चुका असतील तर काही करता येणार नाही,''

जितेंद्र आव्हाड म्हणाले, ''राज्याने कुणावर कधी अशी सूडबुद्धीन कारवाई केली नाही, कुणाला जेलमध्ये टाकलंय असं झालं नाही. चौकशी सुरू असणं आणि घरात धाडी टाकणं यात फरक आहे.” केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सुडबूद्धीने कारवाई सरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी थेट मोदी सरकारलाच आव्हान दिलं. "आम्ही तुरुंगात जायला तयार आहोत, पण आम्ही लढणार आणि तुमच्या बदल्याचं राजकारण समोर आणणार", असं राऊतांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT