Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News
Devendra Fadanvis, Ajit Pawar and Eknath Shinde Latest News  Sarkarnama
मुंबई

'उपमुख्यमंत्री फडणवीसांवर कुठलीच जबाबदारी नाही, प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. सरकारकडे पूर्ण बहुमत असतानाही विलंब का होत आहे? मंत्रिमंडळ विस्तारासाठी सरकार कुणाची वाट पाहत आहेत? उपमुख्यमंत्र्यांवर कसलीही जबाबदारी नाही. सगळ्या कामांची जबाबदारी ही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर (Eknath Shinde) आहे. काहीही झालं की प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते,असा टोला विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लगावला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुनही सरकारवर हल्लाबोल केला. (NCP, Ajit Pawar Latest News)

राज्याच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये होतो, त्यामुळे मी काही अधिकाऱ्यांना विचारले, तर सांगितले की उपमुख्यमंत्र्यांवर कसलीही जबाबदारी नाही. सगळ्या कामांची जबाबदारी केवळ मुख्यमंत्र्यांवर आहे. काहीही झालं की प्रत्येक फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाते. एक महिना उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमत असतानाही विलंब का होत आहे? मंत्रिमंडळ विस्तारासाठी हे सरकार कुणाची वाट पाहताय?, असा टोला पवारांनी फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.

पवार पुढे म्हणाले, मी नुकताच राज्यातील काही भागाचा दौरा करून आलो आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सोयाबीनवर रोग पडला आहे. फळबागांचं खूप नुकसान झाले आहे. पीकविम्याबद्दल पुढे काय होणार हे कळायला शेतकऱ्यांना मार्ग नाही. राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि खरीप पिकाला हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबाग नुकसानाला हेक्टरी दीड लाख रुपये मदत दिली पाहिजे. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झाले नाहीत.

केंद्रीय पथकाकडून पाहणी नाही. काही ठिकाणी आर्थिक मदत मिळाली. मात्र अदयापही अनेक शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेतच आहेत. अधिकाऱ्यांनी मदतीचे प्रस्ताव पाठविले आहेत, पण अजून मदत झालेली नाही. लोकांची घर कोसळली आहेत. घरातील कपडे, धान्यांचं आतोनात नुकसान झाले आहे. दुकानातील मालाचे, धान्याचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांची सरकारला चिंता नाही, असा आरोप पवारांनी मुख्यमंत्री शिंदेवर केला.

शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना मदत करायची सोडून मुख्यमंत्री गाठीभेटी घेतात. रात्री दहानंतरही मुख्यमंत्र्यांचं भाषण होते. वास्तविक रात्री दहानंतर सर्वोच्च न्यायालयाने माईक बंद केलेला आहे. गणेशोत्सव, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अशा काही अपवादात्मक दिवसांसाठी मुभा दिली आहे. पण यातलं काहीही पाळलं जात नाही. राज्याचे प्रमुखच नियम मोडतात. मग अशावेळी तिथला पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त काय करणार? मुख्यमंत्री घटना पायदळी तुडवायला लागले तर बरोबर नाही. उपमुख्यमंत्र्यांचं दहा नंतरचे कार्यक्रम काही पाहिले नाही, त्यामुळे त्यावर काही जास्त बोलू शकत नाही, अशीही टीका पवारांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT