Anil Deshmukh
Anil Deshmukh  Sarkarnama
मुंबई

Politics : अनिल देशमुखांनी लिहिलं थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र; काय आहे पत्रात?

सरकारनामा ब्यूरो

Politics : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं असून कापसाला प्रतिक्विंटल 10 हजार रुपयांचा दर देण्याची मागणी अनिल देशमुख यांनी केली केली आहे.

सध्या सरकारने कापसाला प्रति क्विंटल 6 हजार 380 असा दर निश्चित केलेला आहे. मात्र, हा दर खूप कमी असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. सरकारने जाहीर केलेले दर शेतकऱ्यांना परवडत नाहीत. यामधून खर्च देखील निघत नाही.

त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता कापसाच्या दरात वाढ करावी, अशी मागणी देशमुखांनी पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे केली आहे.

सध्या कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तर कापसाच्या दरात वाढ होईल, अशी प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

केंद्र सरकारने कापसाची किंमत 6 हजार 380 रुपये निश्चित केलीय. हे दर कमी असल्यामुळं बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या कापसाचे प्रमाण कमी झाले आहे.

सध्या 7 हजार 500 ते 8 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकला जात आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळे कापसाच्या दरात वाढ होणार की नाही? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT