Hitendra Thakur, Eknath Khadse
Hitendra Thakur, Eknath Khadse sarkarnama
मुंबई

शेवटच्या क्षणी खडसेंची खेळी : ठाकूर कुणाला दणका देणार?

संदीप पंडीत

विरार : विधानपरिषद निवडणुकीच्या (Legislative Council election) पूर्वसंध्येला आज राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांच्य भेटीसाठी ठाकूरांच्या विरार येथील कार्यालयात आले आहेत. आतापर्यंत ठाकूरांच्या भेटीला शिवसेना (Shivsena) वगळता काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपच्या (BJP) उमेदवारांनी त्यांची भेट घेऊन पाठिंब्यासाठी गळ घातली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसून त्यांचा एक उमेदवार पडल्याने आता आघाडीतील दोन्ही काँग्रेसने पाठिंब्यासाठी अपक्षांच्या भेटी घेतल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे नेते आणि उमेदवार एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी 14 जून रोजी सर्वात आधी काँग्रेसचे भाई जगताप यांनी ठाकूर यांची भेट घेऊन बविआची 3 मत देण्याची विनंती त्यांनी केली होती.

त्यानंतर भाजपच्या आमदार मनीषा चौधरी, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. त्यानंतर विधानपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि शनिवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपचे उमेदवार प्रवीण दरेकर यांनी ठाकुरांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ठाकुरांची भेट घेतल्याने त्यांचा पाठिंबा कोणाला मिळणार हे मात्र, अजूनही गुलदस्त्यात राहिले आहे.

उद्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना एका मताची धाकधूक

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी एकएकेका मताची जोडणी करताना सर्व्याच पक्षाच्या नाकीनऊ आले आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन मतापैकी एका मताची धाकधूक काँग्रेस आणि भाजपला लागून राहिली आहे. बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर हे कौटुंबिक कामासाठी न्यूयार्कला गेल्याने ते उदयच्या मतदानासाठी येणार का? हा प्रश्न याठिकाणी चर्चेत आहे. क्षितिज ठाकूर उद्या येणार कि नाही हेच प्रश्न राजकीय पक्ष एकमेकांना विचारत आहेत. जर ठाकूर मतदानाला आले नाही तर त्याचा फटका कोणाला बसणार आणि आले तर कोणाला मत देणार. हा याठिकाणचा चर्चेचा विषय झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT