Jayant Patil
Jayant Patil Sarkarnama
मुंबई

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं काय होणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीमुळं (Rajya Sabha Election) राज्यातील वातावरण तापलं आहे. या निमित्तानं महाविकास आघाडी आणि भाजप (BJP) असा सामना पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) आणि भाजप अशी थेट लढत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाची आणि महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Rajya Sabha Election News Updates)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्षांशी विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते. समाजवादी पक्ष हा उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरोधात असून, त्यांचा मुलाधारही तोच आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील.

सध्या कोरोनाची साथ सुरू आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध व्हावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मत देताना आधी दाखवायचे असते त्यामुळं कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही. मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करत आहे. पण या निवडणूका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. निवडणुकीच्या रिंगणात उतरेल तो उमेदार मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच. त्यात त्याला दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला १७० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

विधानसभेच्या सर्व सदस्यांना आज महाविकास आघाडीकडून सूचना करण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीचे बहुसंख्य आमदार हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्या सर्वांसाठी ही बैठक होती. विधान परिषदेसाठीही आमची चर्चा सुरू आहे. आमच्या दोन जागा असून, त्यावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबतचा निर्णय जाहीर करु, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT