Deepak Kesarkar News, Jitendra Awhad News, Shivsena News, Political News
Deepak Kesarkar News, Jitendra Awhad News, Shivsena News, Political News  sarkarnama
मुंबई

'अहो केसरकर किती बोलता; पवार साहेबांचा 'तो' निरोप घेऊन मीच आलो होतो!'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) आज पर्यंतच्या फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात असल्याचा गंभीर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला होता. यावरुन राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केसरकर यांचा चांगलाच समाचार घेतला.(Deepak Kesarkar Latest Marathi News)

या संदर्भात आव्हाड यांनी ट्वीट केले. आपल्या ट्वीटमध्ये आव्हाड म्हणाले, ''अहो केसरकर किती बोलता पवार साहबांविरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात 2014 ला मीच आलो होतो, साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा खाजवून खरूज काढू नका''असा हल्लाबोल आव्हाड यांनी केला.

दरम्यान, बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते केसरकर यांचे शरद पवार साहेबांवरील वक्तव्य हे बेजबाबदारपणाचे असल्याची टीका राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे. तर पवारसाहेबांनी शिवसेना आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान आणि मैत्री जपण्याचे काम केले आहे. केसरकरांना शिवसेनेचा इतिहास आणि जे लोक बाहेर पडले त्यांची कारणे कदाचित माहीत नसावीत, असा टोला तपासे यांनी केसरकरांना लगावला होता.

पुढे बोलतांना तपासे म्हणाले, जेव्हा फडणवीस यांनी शिवसेनेला झिडकारले त्यावेळी पवार साहेबांनीच शिवसेना-कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले होते. हे केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही तपासेंनी केसरकरांना करुन दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही केसरकर यांच्यावर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली. ते म्हणाले ''केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही'' असा टोला लगावला.

दिपक केसरकर काय म्हणाले होते?

पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले होते की, नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मदत केली. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचा दावा केसरकरांनी केला. तर छगन भुजबळ यांना स्वत: शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले. तसेच राज ठाकरे यांच्या पाठिशीही पवारांचे आशीर्वादच होते. कारण पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत, असे सूचक वक्तव्य केसरकरांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT