Jitendra Awhad Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

टिळकांनी समाधीसाठी समिती स्थापन केली, पैसे जमवले पण जीर्णोद्धार केला नाही! आव्हाडांचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादमधील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर राज्यात राजीपातीचं राजकारण वाढल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली. त्या टिळकांनाही तुम्ही ब्राम्हण म्हणून बघणार का, असा सवालही ठाकरेंनी केला होता. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Jitendra Awhad Latest Marathi News)

जितेंद्र आव्हाड यांनी 1818 मधील एका लिखाणाचा संदर्भ देत शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी केला नाही, असा दावा केला आहे. याबाबत आव्हाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1926 साली ब्रिटिशांनी शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती ह्या दोघांनी मिळून केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती. पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली .पत्र व्यवस्थित वाचा, असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याबाबतचे एक पत्रही त्यांनी ट्विट केलं आहे.

हेडलाईन घेण्याचा प्रयत्न

आव्हाड यांनी माध्यमांशी बोलतानाही राज ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, गेल्या साठ वर्षात महाराष्ट्राचे राजकारण केवळ शरद पवार या व्यक्तिमत्वाभोवतीचं फिरत आहे. राज ठाकरेंचा जन्म होण्याआधी पवारांचा राजकीय प्रवेश झाला. त्यानंतर त्यांच्या काकांनीही साहेबांवर टीका केली. पण त्या दोघांची अत्यंत जवळची मैत्री होती. तुम्ही आता आता राजकारणात आला आहे. तोही द्वेषापोटी. उद्धव ठाकरेंचा द्वेष करत राजकीय प्रवेश केला. त्या द्वेषातूनच राजकीय माणसं बदलत जातात. महाराष्ट्रातील खराखुरा भीष्म पितामह त्यांच्यावर टीका करून हेडलाईन घेण्याचा प्रयत्न असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT