jitendra awhad  sarkarnama
मुंबई

रेल्वे भरतीवरुन आव्हाड संतापले; केंद्र सरकारकडे ६२५ करोड रुपये पडून

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेबाबत वास्तव सांगितलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : रेल्वे भर्ती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बिहार (Bihar) आणि उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन (RRB NTPC Protest) सुरू केलं आहे. बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे (Uttar Pradesh student agitation)राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी याबाबत केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेबाबत वास्तव सांगितलं आहे. आव्हाडांनी याबाबत टि्वट करीत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?” असे टि्वट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

''NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,'' असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. शेकडो लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर आता पुन्हा आंदोलक विद्यार्थ्यांच्या वतीने आज बिहार बंदची हाक देण्यात आली आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सर येथे रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले आहे.

परीक्षा देणाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था हातात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी काही ठिकाणी लाठीचार्ज केला. तर काही ठिकाणी हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात खान सर या प्रसिद्ध युट्यूबरसह अनेक कोचिंग क्लास चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT