Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
मुंबई

गोसावी अन् खबऱ्याचं चॅट उघड करत मलिकांचा वानखेडेंवर बाण

मलिकांकडून कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर दररोज आरोप केले जात आहे. वानखेडे यांनी वसुलीसाठी आर्यन खानला बनावट प्रकरणात (Aryan Khan Case) अडकवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मलिकांकडून या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मंगळवारी मलिकांनी पुन्हा एकदा वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी सकाळी एक ट्विट करत काशिफ खानची (Kashif Khan) चौकशी का केली नाही, असा सवाल केला आहे. मलिकांनी पुणे पोलिसांच्या अटकेत असलेला आणि क्रूझ प्रकरणाचा साक्षीदार के. पी. गोसावी आणि त्याच्या खबऱ्यामध्ये (Informer) मध्ये व्हॉट्सअपवर झालेला संवाद ट्विट केला आहे.

या संवादामध्ये के. पी. गोसावी खबऱ्याला काशिफसह इतर काही जणांचे फोटो मागत आहे. दोघांमध्ये क्रूझवर येणाऱ्यांबाबत संवाद झाल्याचे या चॅटवरून दिसते. या चॅटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत मलिकांनी काशिफ खानची या प्रकरणात चौकशी का केली नाही, काशिफ खान आणि समीर दाऊद वानखेडे या दोघांमधील संबंध का आहेत, असे सवाल उपस्थित केले आहेत.

दरम्यान, ''सॅम डिसोझा यांने दिल्लीत पैसे दिल्याची माहिती दिली आहे. सॅम डिसोझा हा वानखेडे निर्दोष असल्याचे सांगत आहे. तो समीर वानखेडेंचा प्रायव्हेट ड्रग्ज डीलर आहे. क्रूझ वरील पार्टीचा आयोजक काशिफ खान होता. काशिफ खान याला अजून का पकडण्यात आले नाही. काशिफ खान हा गोव्यात आहे," अशी माहिती मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती.

''पैशाचा वापर करुन सरकार पाडता येत नाही. मलाही वारंवार ईडीकडून धमकवण्यात येत आहे. पर्याय संपतात तेव्हा दंगली घडविल्या जातात. ही भाजपच्या जुनी पद्धत आहे. भाजपनं नकारात्मक राजकारण करु नये,'' असे मलिक (Nawab Malik) यांनी यावेळी सांगितले होते. मलिकांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंबाबत (Sameer Wankhade) गैाप्यस्फोट केला.

''कार्डिलिया ड्रग्ज प्रकरणी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी तक्रारी केल्या आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलिसाकडून (SIT) तपास सुरू आहे. सॅम डिसोझा यांची व्हिडिओ क्लिप आम्ही दाखवली होती, असेही मलिक म्हणला होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT