Sushama Andhare sarkarnama
मुंबई

Sushama Andhare : राष्ट्रवादीतून शिवसेनेत येताच सुषमा अंधारेंना मिळालं मोठं गिफ्ट

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदार आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकीकडे आमदार-खासदारांच्या बंडामुळे डॅमेज कंट्रोल भूमिकेत गेलेल्या शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. शिवसेनेत इनकमिंग सुरु झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी आज शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. (Sushama Andhare news update)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेही (Neelam Gorhe)उपस्थित होत्या.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे या भीमा कोरेगाव प्रकरणातील तक्रारदार आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्यांना आपण मोठं केलं त्या व्यक्ती पलिकडे गेल्या . शिवसेनाप्रमुखांनी अनेक सामान्यांना असामान्य केलं. जे असामान्य झाली ती निघून गेली. पण आता परत सामान्यांना असामान्य घडवण्याची वेळ आली आहे. खऱ्याखुऱ्या शिवसेनेची पुर्नबांधणी आपण करीत आहोत. एका वेगळ्या विचाराची व्यक्ती आणि त्यांच्या समर्थकांना शिवसेनेची भूमिका पटल्यानंतर अंधारे या शिवसेनेत सामील झालेल्या आहेत,"

"अनेक जणांवर नव्याने जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांनाही आता संधी द्यायची आहे. अंधारे यांच्यावरही संघटनेची जबाबदारी द्यायची आहे,"असे सांगत ठाकरेंनी अंधारे यांच्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली.याप्रसंगी अंधारे या भावुक झाल्या होत्या.

विश्वासाला तडा जाऊ देणार नाही..

सुषमा अंधारे म्हणाल्या, "कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडले, आमचा एकच शत्रू असून त्याच्याशी लढण्यासाठी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मान्य करीत आहे. शिवसेनेत मी नविन आहे, ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे या माझ्यासाठी नेहमीत आदर्श राहिल्या असून पक्षात त्या मला आईसारख्या सांभाळून घेतील, तसंच शिवसेनेतील नेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ,"

अंधारे यांनी यावेळी शिंदे गटाला टोला लगावला. "आज गळे काढू रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामील व्हायचं असंही होणार नाही," असे अंधारे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT