NCP Minister Nawab Malik sarkarnama
मुंबई

ईडीची कारवाई झाली तरी मलिक मंत्रीपदी राहणार : राष्ट्रवादीचा न झुकण्याचा निर्धार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आज सकाळी ईडीने (ED) कारवाई केली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर ईडीने मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात तब्बल ७ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यावरुन राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मलिक यांना अटक झाल्यानंतर राजकीय चक्रेही वेगाने फिरत आहेत. राष्ट्रवादीने आपल्या सर्व मंत्र्यांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दौरा रद्द झाला आहे. ते तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर मलिक यांच्यावरील आरोप खोटे असल्याने त्यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे मत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीची भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ईडीनेच्या रडावर महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेच्याही नेत्यांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणिही आरोप केले आणि खोट्या आरोपात मंत्र्यांना अटक झाली तर आपण राजीनामा काय घ्याचा असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडू करण्यात येत आहे. राजीनामा घेतल्यामुळे सरकार अडचणीत येवून शकते. तसेच सरकारची प्रतिमाही डागाळली जाऊ शकते. त्यामुळे राजीनामा नको अशी भूमिका घेतली जात आहे. मात्र, मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

दरम्यान, मलिक हे रोज स्वतःच्या ट्विटरवरून अॅक्टिव्ह होते. भाजपला रोज इशारे ते आपल्या ट्विटमधून द्यायचे. मात्र त्यांना ईडीने नेल्यानंतर त्यांच्या ट्विटर अकौंटद्वारे संवाद बंद झाला. त्यांच्या कार्यालयातून यासंबंधीचे ट्विट जारी करण्यात आले. त्यातही त्यांनी मैं झुकूंगा नही, असे ट्विट देऊन आव्हान कायम असल्याची भाषा ठेवण्यात आली. मलिक यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दिला. हे सर्व ट्विट मलिक यांच्या कार्यालयाने रिट्विट केले. शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय राऊत, अमोल कोल्हे या नेत्यांनी मलिक यांना पाठिंबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT