Mahesh Tapase sarkarnama
मुंबई

Sanjay Shirsat : बंडखोर आमदारांना चूक केली असं वाटतयं ; शिरसाटांवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी डिलीट केलेल्या पोस्टवर अनेकांनी नवीन पोस्ट शेअर करुन त्यांना डिवचलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिंदे गटातील औरंगाबादेतील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या ट्विटनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ''मी भावनेच्या भरात बोलून गेलो. पण स्पष्ट सांगतो की, हा सर्व माझ्या मोबाईलचा झालेला टेक्निकल प्राॅब्लेम आहे. मागची पोस्ट कशी पुन्हा फाॅरवर्ड झाली हे मला आता सांगता येणार नाही'' असे स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले.

शिरसाट यांनी डिलीट केलेल्या पोस्टवर अनेकांनी नवीन पोस्ट शेअर करुन त्यांना डिवचलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, प्रवक्ते महेश तपासे यांनी शिरसाटांना टोला लगावला आहे. "आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते तर तो त्यांचा अंतरआत्म्याचा आवाज होता," असा टोला महेश तपासे यांनी लगावला आहे.

महेश तपासे म्हणाले, "आमदार संजय शिरसाट हा त्यांचाच आवाज नव्हता तर बंड केलेल्या अनेक आमदारांना आपण चूक केली असं वाटायला लागलं आहे. ट्वीट डिलीट करुन लगेच ते तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरील भाव आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती,"

"आमदार संजय शिरसाट यांच्या ट्वीटनंतर या आमदारांना सत्तेचं लालच दाखवून घेण्यात आल्याचे कारस्थान भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे असा थेट आरोप करतानाच हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे," असेही महेश तपासे यांनी नमूद केले.

काय होते शिरसाटांचे टि्वट

आमदार संजय शिरसाट यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश झाला नाही. यामुळे ते नाराज होते. त्यातच त्यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'कुटुंबप्रमुख' म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. 'आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही, तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत,' हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT