Prakash Ambedkar
Prakash Ambedkar sarkarnama
मुंबई

राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पडणार : आंबेडकरांचा खळबळजनक दावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यात सुरू असतानाच त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी त्यात आणखी खळबळजनक दावा केला आहे. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचक विधान केले आहे. ही निवडणूक शिवसेनेचा सहावा उमेदवार असलेले संजय पवार (Sanjay Pawar) यांच्याविरुद्ध भारतीय जनता पक्षाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) असा सामना होणे अपेक्षित असताना आंबेडकर यांनी या निवडणुकीत राष्ट्रवादीला (NCP) धक्का बसणार असल्याचा दावा केला आहे. (Rajya Sabha election update)

त्यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचा राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न आहे. भाजपचे सहावे उमेदवार धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे यापूर्वीचे खासदार होते. साखर कारखानदारी आणि सहकाराचा त्यांना अभ्यास आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातील गडाला भगदाड पाडण्याचा कसोशीने प्रयत्न चालवलेला आहे. धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीमुळे  प्रत्यक्षात भाजप-शिवसेनेतील ही लढत राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशी झाली असल्याचे  निरीक्षण त्यांनी नोंदविले.

राष्ट्रवादीला स्वत: चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदवार संजय पवार यांना निवडून आणावा लागेल. तो उमेदवार निवडून न आल्यास भाजपने राष्ट्रवादीच्या गडात प्रवेश केला असे म्हटलं जाईल. राष्ट्रवादीला पूर्णपणे आव्हान देणं भाजपला सोपं जाईल. केंद्राच्या हातात इथेनॉलचं लायसन्स आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या साखर कारखानदारांना इथेनॉलचं लालूच दाखवून ते त्यांना भाजपकडे घेतील आणि राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते. राज्यसभा निवडणुकीत आतापर्यंतचा सर्वात मोठा घोडेबाजार होणार असल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल. महाराष्ट्राची जनता हे पाहतेय, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT