Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
मुंबई

'सदाभाऊंची स्थिती भाजपच्या फडात तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी'

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे शेतकऱ्यांचे नेते असून त्यांच्यावर टीका करण्याएवढा मोठा मी नाही. मात्र सदाभाऊंची परिस्थिती भाजपच्या फडातील तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी खोतांना लगावला आहे.

एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मिटकरी हे डोंबिवलीत आले होते. त्याआधी त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. वंडार पाटील व सुधीर पाटील यांच्या कार्यालयात आले होते. यावेळी 'अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या आहे. त्यांचे फार मनावर घेण्याचा प्रश्न नाही.' असे विधान सदाभाऊ खोतांनी केले होते. यावर माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मिटकरींनी सदाभाऊंना टोला लगावला.

मिटकरी म्हणाले, सदाभाऊ यांची परिस्थिती भाजपच्या फडात तुणतुणे हाती घेणाऱ्या माणसासारखी झाली आहे का?, असा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पिंजरा चित्रपटात गुरुजींनी आधी तमाशाला विरोध केला होता आणि नंतर त्यांनाच तमाशात नाचावं लागलं, तशीच सदाभाऊंची अवस्था झालीये. आगामी काळात भाजपच्या फडात तुणतुणे घेऊन नाचणाऱ्याची सदाभाऊंची भूमिका राहील, अशी टीका करत सदाभाऊंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राणा यांना पोलीस स्टेशन मध्ये मिळालेली वागणूक आणि समोर आलेले पोलीस स्टेशन मधील सीसीटीव्ही याबाबत मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचं भाजपचं सुप्त कारस्थान असल्याचा हा प्रत्यय आहे. राणा यांना चहा, पाणी दिल्याचा व्हिडीओ पोलीस आयुक्तांनी ट्विट केला, मग वकील म्हणाले दुसऱ्या पोलीस स्टेशनचा आहे. आता तो व्हिडीओ सुद्धा आता समोर येईल. दलित असल्यानं त्यांना अशी वागणूक मिळाली, असे ते म्हणतात हे धादांत खोटं आहे. गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना सन्मानाची, इतर कैद्यांसारखी वागणूक दिली गेली आहे. राणा यांना आताच ऍट्रोसिटी, दलित विषय का आठवला? मुळात त्या ज्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, त्यांची कागदपत्रं खोटी आहे हे एकदा तपासलं पाहिजे, कोर्टानं एकदा फटकारलं सुद्धा आहे. आताच दलित, संविधान हे सगळं आठवलं हा विरोधाभास आहे. भारतीय जनता पार्टीचं हे षडयंत्र फसलं आहे असे दिसून येते, असा टोसाही मिटकरींनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT