har har mahadev marathi movie
har har mahadev marathi movie sarkarnama
मुंबई

NCP : राज ठाकरेंच्या सहभाग असलेल्या चित्रपटावर राष्ट्रवादीचा आक्षेप ; नव्या वादाला तोंड फुटले !

सरकारनामा ब्युरो

Amol Mitkari : अनेक महिन्यांपासून चर्चेत असेलला "हर हर महादेव" या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. "हर हर महादेव" हा मराठीतली पहिला बहुभाषिक सिनेमा ठरला आहे. मराठीसह पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (har har mahadev marathi movie latest news)

या चित्रपटात सह्याद्रीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज आहे.मराठीतील ‘हर हर महादेव’ हा ऐतिहासिक चित्रपट 25 ऑक्टोबरला दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला असून टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. आता त्यावर राष्ट्रवादीनं टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी "हर हर महादेव" या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.अमोल मिटकरी यांनी टि्वट करुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. “सुबोध भावे यांनी साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका (अभिनय छान असला तरीही) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते”, असे अमोल मिटकरी यांनी टि्वटमध्ये म्हटलं म्हटले.

आपल्या टि्वटमध्ये मिटकरी म्हणतात, "अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक व जेधे _ बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही ,"

"VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर "हर हर महादेव"या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली "छ.शिवरायांची " भुमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. श्री राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते,"असे मिटकरी यांनी म्हटलं आहे.

या चित्रपटात अमृता खानविलकर, सायली संजीव, सुबोध भावे, शरद केळकर, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे हे कलाकारांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT