Sharad Pawar | Ajit Pawar  Sarkarnama
मुंबई

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण; हायकोर्टाची शरद पवार गटाला नोटीस

Sharad Pawar Vs Ajit Pawar : आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात अजित पवार गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Ganesh Thombare

Mumbai Political News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर झालेल्या सुनावणीतही राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरवले. (NCP MLA Disqualification News)

पण विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रतेच्या निर्णयाविरोधात अजित पवार (Ajit Pawar) गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आता उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे. तसेच 11 मार्चपर्यंत या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सुनावणी 14 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी ही याचिका दाखल केली होती. नार्वेकरांनी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदारांना अपात्र न करण्याच्या निकालाला या याचिकेच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलेलं आहे.

तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे, मग दुसरा गट तयार होण्याचा प्रश्नच उरत नसल्याचा सवाल उपस्थित करत सर्व आमदारांना पक्षाचा आदेश बंधनकारक असल्याचा युक्तिवाद मुकुल रोहतगी यांनी केला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटिशीवर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून काय भूमिका मांडण्यात येते, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT