राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे ही सुनावणी सुरू आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी सुरू आहे. मात्र आव्हाडांच्या एका आक्षेपवार अध्यक्ष Rahul Narwekar चिडले आणि त्यांनी आव्हाडांना गप्प केले.
जितेंद्र आव्हाड यांची साक्ष सुरू आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्र संदर्भात सुनावणी सुरू आहे. जितेंद्र आव्हाडांची उलट तपासणी सुरू आहे. अजित पवार गटाच्या वकिलांकडून त्यांना विविध प्रश्न विचारले जात आहेत. त्यांचे शिक्षण किती आहे, त्यांना पक्षातील निवडणुकीच्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आले.
मात्र हे सगळे प्रश्न विचारण्याचा काय संबंध आहे, असे सवाल आव्हाडांनी उपस्थित केला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना हा अधिकार आमचा आहे, वकिलांनी कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणते प्रश्न विचारायचे नाही हा अधिकार अध्यक्षांचा आहे. तुमचा नाही असे म्हणत त्यांनी आव्हाडांना फटकारले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाड यांची उलट तपासणी सुरू आहे. या तपासणी वेळी त्यांच्याकडे प्रतिज्ञापत्रशिवाय इतरही कागदपत्रे होती. यावर अजित पवार गटाने आक्षेप घेतला. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दुसरी कागदपत्रे अध्यक्षांच्या परवानगी शिवाय आले कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आव्हाड यांच्याकडे इतरही कागदपत्रे होती ती नसावीत आणि ती ताबडतोब काढूनही घेण्यात आली.
'मला सर्व माहित असावं, असं वाटतं नाही'
आव्हाड यांची उलट तपासणी सुरू असताना अजित पवार गटाकडून विविध प्रश्न विचारले गेले. पक्षाची रचना, पक्षाच्या निवडणुका, रचने बदल प्रश्न विचारले. मात्र या सगळ्यावर मला सगळ्या गोष्टी माहित नाही. निवडणूक समितीत मी नाही. समितीतील सगळ्या गोष्टी मला माहित असणे गरजेचे नाही, असे उत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिले.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.