Rahul Narwekar Sarkarnama
मुंबई

NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण; नार्वेकरांना दोन आठवड्याचा वेळ...

Rahul Narvekar News: 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ

सरकारनामा ब्यूरो

New Delhi: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज (29 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार होती. सुनावणीची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांनी तीन आठवड्याची मुदतवाढ मागितली होती. न्यायालयाने दोन आठवडे मुदत वाढ दिली आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात या याचिकेवरील सुनावणीची संभाव्य तारीख 29 जानेवारी आहे. यापूर्वी ही तारीख 30 जानेवारी होती. आता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 31 जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कुणाचे ? यासंदर्भात सुनावण्या झाल्या. दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आपला निकाल राखीव ठेवला आहे. 8 डिसेंबर 2023 रोजी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT