NCP : उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) कालपासून (बुधवार) मुंबई दौऱ्यावर आहेत.त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.आज ते मुंबईत रोड शो करणार आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टोला हाणला आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
"योगी आदित्यनाथ असो किंवा अन्य कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही," अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं आहे. "मुंबई मराठी माणसाची आहे," असे आव्हाड म्हणाले.
"गोरखपूर आणि मुंबईची बरोबरी करायला गोरखपूरला हजारो वर्षे जातील," असे आव्हाड म्हणाले.त्यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपच्या जुन्या नेत्यांनी मुंबईबद्दल केलेली वक्तव्याची आठवण आव्हाडांनी यावेळी करुन दिली. मुंबईवर मराठी माणसांची कसा हक्क आहे , हे त्यांनी स्पष्ट केले.
योगी आदित्यनाथ यांनी अभिनेता अक्षय कुमारचीही विशेष भेट घेतली. योगींनी उत्तर प्रदेशातल्या फिल्मसिटीबाबत अक्षयशी विशेष चर्चा केल्याची समजते.
योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यात अदानी समूह, पिरामल, टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह,एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक मोठ्या उद्योगपतींची भेट घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.