NCP MLA Rohir Pawar, BJP Leader Pravin Darekar
NCP MLA Rohir Pawar, BJP Leader Pravin Darekar  Sarkarnama
मुंबई

दरेकरसाहेब, भाजपातील उपटसुंभांचा ‘छंद’ आपल्याला दिसत नाही का?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुणे दौऱ्यावेळी झालेल्या राड्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजून एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. या वादातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक उडत आहे. (NCP MLA Rohit Pawar Latest Marathi News)

रोहित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिरमध्ये वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्यानंतर भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला चंद्रकांतदादांनीही प्रत्युत्तर दिलं. रोहित बाबा असा उल्लेख करत त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे बोट दाखवलं होतं. (Rohit Pawar criticizes BJP Leader Pravin Darekar)

ट्विटरवरील ही शाब्दीक चकमक इथेच थांबली नाही. रोहित पवारांनी पुन्हा पलटवार करत उत्तर दिलं. यात बुधवारी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही उडी घेतली. रोहित पवार हे वयाने लहान आहेत. चंद्रकांतदादांवर टीका करायला शरद पवार, अजित पवार आहेत. त्यामुळे सल्ला देण्याची घाई करू नये, असं ट्विट दरेकरांनी केलं होतं. रोहित पवारांनी ट्विट करत दरेकरांच्या या टीकेलाही उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत रोहित पवार?

दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात?

मोठ्या नेत्यांना सल्ला देणं/त्यांच्यावर हल्ला करण्याएवढा मी मोठा नसल्याची मला जाणीव आहे. पण राज्यातील तुमच्या पक्षातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय समंजसपणाची अपेक्षा करणं काही गैर नाही. कारण मोठे नेतेच चुकीचं वागले तर त्याचं अनुकरण लहानही करत असतात.

हेच मोठे नेते चुकीचं समर्थन करत असतील तर महाराष्ट्रात आजवरच्या नेत्यांनी निर्माण केलेल्या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला तडा जाण्याचीही भीती वाटते. महाराष्ट्राप्रमाणे देशात इतरत्र कुठंही दिसत नसलेली ही राजकीय संस्कृती खरंतर आपण सर्वांनीच जपायला हवी.

दरेकर साहेब वयाचा विचार करायचा तर आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीएवढंही वय नसलेल्या भाजपातील काही उपटसुंभांचा साहेब व इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का? अशांना महत्त्व देत नाही, पण ते गरळ ओकताना भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT