Shah Rukh Khan, Rohit Pawar  Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar News : रोहित पवारांनी केलं शाहरुख खानचं कौतुक; म्हणाले, 'जवान'मध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न'

Rohit Pawar on Shah Rukh Khan : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय 'जवान'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Mangesh Mahale

Mumbai : 'किंग खान' शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सात सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट खूपच चांगला आहे, असं कौतुक प्रेक्षक करीत असताना राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट), आमदार रोहित पवार यांनी शाहरुखचे कौतुक केले आहे.

"शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटामध्ये लोकशाहीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे विषय 'जवान'मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे," अशा शब्दांत रोहित पवारांनी 'किंग खान' शाहरुखचे तोंडभरून कौतुक केले आहे.

"जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद वापरत नाहीत, तोपर्यंत चांगल्या विचारांचे लोक निवडून येणार नाहीत," असे ते म्हणाले. कल्याणमधील केएम अगरवाल कॉलेजमध्ये आयोजित गांधी पर्व कार्यक्रमात रोहित पवार बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रोहित पवार सध्या कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी अजित पवार गटातील नेते, भाजपवर टीका केली. "रोहित पवारांना अजितदादा व्हायचंय," अशी टीका अजित पवार गटातील नेते सुनील तटकरे यांनी केली होती, त्याला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"अजितदादा मोठे नेते आहेत, मला अजितदादा व्हायचं नाही. मी नेता बनण्यासाठी राजकारणात आलो नाही, विचार जपण्यासाठी आलो आहे. काही नेत्यांना तर वाटत असेल की मला नेता बनायचे तर मला नेता बनण्याची घाई नाही," असा टोला रोहित यांनी तटकरे यांचे नाव न घेता लगावला.

"भाजपने केलेले सर्वेक्षणाचे रिपोर्ट हे भाजपची परिस्थिती ठीक नसल्याचे दाखवित आहेत. त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. त्यानंतरही भाजपची स्थिती सुधारत नाही. हे पाहता भाजपने शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडला. सत्तेसाठी ही फोडाफोडी करूनदेखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही," असे रोहित म्हणाले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT