NCP New President  news update
NCP New President news update Sarkarnama
मुंबई

NCP New President : अध्यक्षपदी तुम्हीच राहा ! ; शरद पवारांना देशभरातून ज्येष्ठ नेत्यांचे फोन, आजच्या निर्णयाकडे लक्ष..

सरकारनामा ब्यूरो

Rashtrawadi New President : ‘लोक माझ्या सांगाती’ या राजकीय आत्मवृत्ताच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षापदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.

पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून सर्वांची मनधरणी सुरू आहे. पवारांनी त्यांच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर बसले आहेत. शरद पवार यांनी गुरुवारी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पवारांनी त्यांच्या निर्णय मागे घ्यावा, यासाठी देशपातळीवरील नेत्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना फोन करुन 'अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहावे," अशी विनंती केली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे.

भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीला फार काळ शिल्लक नसल्याने शरद पवार यांनी पक्षकार्यात कार्यरत राहावे, अशी इच्छादेखील या दोघांनी व्यक्त केल्याचे समजते.

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम ,आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग, सीपीआयचे चे नेता डी राजा यांनी पवारांना फोन केला आहे, अध्यक्षपदी पवारांनीत राहावे, अशी विनंती या नेत्यांनीही केली आहे.

लोकसभा निवडणुकीला फार काळ शिल्लक नसल्याने शरद पवार यांनी पक्षकार्यात कार्यरत राहावे, अशी इच्छादेखील या नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते. भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट करण्यासाठी शरद पवार हेच नाव अग्रणी असल्यामुळे त्यांनी राजीनाम्याचा विचार मागे घ्यावा असे विरोधी पक्षांचे मत आहे. काल (गुरुवारी) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसमोर आंदोलन केले.

"तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेवून आणि बाहेरून आलेल्या सहकार्‍यांना विश्वासात घेऊन येत्या 1 ते 2 दिवसांत आपण अंतिम भूमिका घेऊ, पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातील भावना दुर्लक्षित करणार नाही. पुढील 2 दिवसांनंतर तुम्हाला असे बसावे लागणार नाही, अशी ग्वाही देत पवारांनी आपला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.

पवार यांच्या या ग्वाहीचे कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले, मात्र पवार यांची धक्कातंत्राची शैली पाहता ते नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता कायम आहे. आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीची बैठक आहे. त्यानंतर अध्यक्षाबाबतचा निर्णय होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT