Ncp News : राज्यामध्ये पुढील काळात विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. विधान परिषद निवडणुकांचे विविध राजकीय पक्षांना आणि पक्षातील इच्छुक नेत्यांना वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. या बैठकीला पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
राज्यात आता लवकरच विधान परिषदेच्या काही जागांसाठी निवडणूका पार पडणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना पक्ष व इतर घटक पक्ष असे मिळून, महाविकास आघाडीत म्हणून या निवडणूक सामोरे जाण्याच्या तयारी असल्याचे दिसते. मागील राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत झालेला दगाफटका लक्षात घेता, या वेळी महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस तयारीनिशी उतरणार आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणूकीतील रणनीती या बैठकीत आखण्यात येणार आहे. यासोबतच सद्याच्या राजकीय परिस्थितीवर याबाबत होणार चर्चा होणार आहे.बैठकीसाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांना बैठकीसाठी बोलवण्यात आले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.