Sharad Pawar, Jayant Patil, Santosh Pawar, Suraj Chavan sarkarnama
मुंबई

NCP Politics : भाकितावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांत रंगला वाद; शरद पवार गटाकडून सूरज चव्हाण यांना १ रुपयाचा चेक...

Santosh Pawar Attack on Suraj Chavan जयंत पाटील हे शरद पवारांचे एकनिष्ट नेते आहेत. सूरज चव्हाण यांनी चार जूननंतर अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून दाखवावे, असा सल्लाही दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

NCP News : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाकित केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार आहेत. या वक्तव्यावरुन शरद पवार पक्षाचे मुंबई दक्षिणचे युवक अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सूरज चव्हाण यांचा समाचार घेतला आहे.

चार जूनच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP प्रांताध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जातील. त्यांनी काँग्रेसचे नेते राहूल गांधी व सोनिया गांधी यांची वेळ मागितली आहे. त्यांचा मुहूर्त ही ठरलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार Sharad Pawar पक्ष रिकामा होईल, असे भाकित सूरज चव्हाण यांनी केले होते.

त्यावरुन मुंबई दक्षिण युवकचे अध्यक्ष संतोष पवार यांनी सुरज चव्हाण यांना एक रुपयाचा चेक देऊन भाकित वर्तविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी हा आमचा चेक स्वीकारावा, असे सांगत त्यांनी ४ जूननंतर अजित पवारांशी एकनिष्ठ राहून दाखवावे, असा टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाकित केलं होतं. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार आहेत. या वक्तव्यावरुन शरद पवार पक्षाचे मुंबई दक्षिणचे युवक अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सूरज चव्हाण यांचा समाचार घेतला आहे.

श्री. चव्हाण यांनी म्हटले की, सूरज चव्हाण यांनी केलेल्या भाकिताबद्दल त्यांना आम्ही एक रुपयाचा चेक भेट देत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. जयंत पाटील हे शरद पवारांचे एकनिष्ट नेते आहेत. सूरज चव्हाण यांनी चार जूननंतर अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ राहून दाखवावे, असा सल्लाही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT