Political News: राज्यात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या अजून काही नेत्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अजून काही जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
या सर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व घडामोडींवर भाष्य केलं आहे."राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सहकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. याचे सर्व श्रेय हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातं", अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर भष्ट्राचारी पक्ष आहे, म्हणून टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर आमचे काही सहकारी सरकारमध्ये सहभागी झाले असावे. त्यामुळे मी याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देतो. जे काही घडले त्याची मला चिंता नाही", असंही यावेळी शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांना यावेळी माध्यामांच्या प्रतिनिधींनी तुमचं घर फुटलं असं वाटतं का? यावर उत्तर देत शरद पवार म्हणाले, "आमचं घर फुटलं असं मला अजिबात वाटत नाही. हा प्रश्न घर फुटण्याचा नाही तर प्रश्न जनतेचा आहे. सध्या अनेक लोकं मला संपर्क साधत आहेत. याआधी 56 पैकी 50 गेले तरी आम्ही उभा राहिलो. यापुढेही राहू", असं ते म्हणाले.
"पक्ष फुटला याची मला चिंता नाही. मात्र, त्यांचे पुढे भवितव्य काय आहे? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानकेल्यामुळे आमचे सहाकारी त्यांच्यासोबत गेले असावे, असं पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.