NCP Facebook Post
NCP Facebook Post Sarkarnama
मुंबई

मोदींच्या रोजगार मेळाव्याची राष्ट्रवादीने उडवली खिल्ली : ‘मालक, निदान लाखाचा तरी आकडा गाठायचा की...’

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील ७१ हजार पात्र तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मोदींच्या रोजगार मेळाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) कडक शब्दांत समाचार घेण्यात आला आहे. ‘मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करा. या गतीने दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का?’ असा सवालही राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. (NCP ridiculed Prime Minister's employment Melava)

राष्ट्रवादीच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करा. या गतीने दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का?’ प्यारे देशवासियों, देशात २०१४ पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्वासनं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना तोंडपाठ झाली आहेत. त्यापैकी वर्षाला दोन कोटी रोजगाराचे स्वप्न रंगवलेल्या मोदी सरकारने लाजेखातर निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करायचा होता.

मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात दोन कोटीप्रमाणे एकूण १६,००,००,००० इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. मात्र, टप्याटप्याने भरती प्रक्रिया करून देखील रोजगार एक लाखापर्यंतही पोचत नाही, ही मोदी सरकारची नामुष्की म्हणावी लागेल. या गतीने मोदी सरकारचा कारभार चालत राहिला, तर युवकांना दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे देशात योग्य रोजगार निर्मिती होण्यासाठी २०२४ मध्ये सक्षम सरकारची निर्मिती करण्याची जबाबदारी आता सुजाण मतदाराची आहे, असे आवाहन राष्ट्रवादीकडून करण्यात आले आहे.

विरोधकांकडून देशातील बेरोजगाराची मुद्दा वारंवार उपस्थित केला जात आहे. त्याचबरेाबर मोदी यांच्या प्रचार सभेतील आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे. मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचा वादा केला होता. मात्र, ते तब्बल आठ वर्षे होत आले तरी तरुणांना रोजगार देऊ शकले नव्हते. त्याला उत्तर म्हणून भाजपकडून रोजगार मेळावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात येत आहे. त्याचीच राष्ट्रवादीने खिल्ली उडवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT