Mumbai News : छत्रपती संभाजीनगरमध्ये महंत रामगिरी महाराज यांनी 'अयोध्या' चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रगीतावर आक्षेप घेतला.
'देशाचं राष्ट्रगीत 'जन-गण-मन' नाही, तर 'वंदे मातरम्' पाहिजे', असे त्यांनी म्हटलं. रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीतावरील घेतलेल्या आक्षेपाचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रामगिरी महाराज यांच्या या आक्षेपावर संतापले आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी, आता त्या रामगिरीला जोड्याने मारायची वेळ आली आहे. बॅनची मागणी कर ना बाबा! आता अति व्हायला लागलं, रामगिरीचं! इतिहास रामगिरीकडूनच शिकायचा देशानं, अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना रामगिरी महाराज यांचा ऐकरी उल्लेख केला आहे.
रामगिरी महाराज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मुस्लिमांच्या भावना दुखल्या जातील असे विधान केले होते. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. या विधानामुळे त्यांच्याविरोधात राज्यभरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तब्बल 58 गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांची (Crime) एकत्र करून खटले चालवला जात आहे.
"प्रत्येक चित्रपटाच्या सुरवातीपूर्वी राष्ट्रगीत वाजवलं जातं, तसं इथेही वाजवलं गेलं. मात्र, हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्यासमोर गायलं. ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं, तर ते जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे 'वंदे मातरम्' हेच खऱ्या अर्थानं आपंलं राष्ट्रगीत आहे."
रामगिरी महाराज यांनी राष्ट्रगीतावर घेतलेल्या आक्षेपावर काही लोक आक्षेप घेतील, असे सांगून जॉर्ज पंचमची यांची स्तुती करताना टागोर यांनी हे गीत गायलं आहे. या गीतातून त्यांनी पंचम यांना तुम्ही भारताचे भाग्यविधाता आहात, असं म्हटलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य असल्याचे म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.