Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar: ऐन हिवाळी अधिवेशनात शरद पवारांच्या आमदाराला कोर्टाचं समन्स; अजितदादांच्या आमदाराची बदनामी?

Rohit Pawar on Manikrao Kokate Defamation Case: तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया मीडियावर व्हायरल केल्यानंतर कोकाटे यांना विरोधकांनी धारेधर धरले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी रमी खेळत असल्याचा आरोप करत विरोधक कोकाटेंवर तुटुन पडले होते.

Mangesh Mahale

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश काढला आहे. पावसाळी अधिवेशनात कोकाटे हे सभागृहात पत्ते खेळतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीकेची झोड उठविण्यात आली होती.

सभागृहाचे काम सुरु असताना कोकाटे हे पत्ते खेळत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ टि्वट केला होता. या व्हिडिओमुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार माणिकराव कोकाटे यांनी केली होती. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी रोहित पवार यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामुळे रोहित पवार न्यायालयात हजर राहतील, का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. उद्या (ता. 9) रोहित पवारांना न्यायालयात हजर राहायचे आहे.

तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया मीडियावर व्हायरल केल्यानंतर कोकाटे यांना विरोधकांनी धारेधर धरले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी रमी खेळत असल्याचा आरोप करत विरोधक कोकाटेंवर तुटुन पडले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. यावरुन सभागृहात गदारोळ झाला होता.

मला रमी खेळताच येत नाही. मी केवळ आलेली जाहिरात स्कीप करत होतो, तेवढ्यात कुणीतर व्हिडीओ काढल्याचे काकोटे यांनी स्पष्टीकरण दिले होते. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. या दरम्यान शेतकऱ्यांबद्दलही त्यांचे वादग्रस्त विधान समोर आलं होतं. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना समज दिली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती.

कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा अंगलट आल्याने त्यांना क्रीडा मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणामुळे त्यांचे कृषीमंत्री काढून घेऊन त्यांच्याकडे क्रीडा मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. हाच युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत केला होता. रोहित पवारांनी व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने आपले कृषीपद गेले, माझ्या वैयक्तीक प्रतिमेला आणि पक्षाला मोठा धक्का बसला, असा युक्तीवाद कोकाटेंनी न्यायालयात केला आहे.

रोहित पवार हे विधान परिषद सदस्य नसतानाही त्यांना व्हिडिओ कसा मिळाला, असा प्रश्न कोकाटे यांनी न्यायालयात उपस्थित केला आहे. उद्या कोकाटे-पवार यांच्याकडून न्यायालयात काय दावे–प्रतिदावे होतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT