sarkarnama
मुंबई

शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय मिळू शकणार नाही!

शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय, विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले, कटकारस्थान केले तरीही मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनाच जिंकणार, '' असा निर्धार शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी आज केला. ते माध्यमांशी बोलत होते. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल आणि जिंकेल, असे राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA)अध्यक्ष होण्यासंबंधीच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांना रविवारी शरद पवारांनी पूर्णविराम दिला.

यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, ''शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढं जाऊ शकत नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय, विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही,''

''युपीएच्या अध्यक्षपदासाठी मला रस नाही, जनाधार असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन पर्याय द्यावा, विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी मी पाठिंबा आणि जी मदत हवी असेल ती देणार आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्याच पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे,'' असे पवार यांनी सांगितले आहे.

भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत राऊत म्हणाले, ''अशा अनेक गाठी भेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात, अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही,'' ''महाराष्ट्रातील राजकारणात सेना मेरिटमध्ये आहे. शिवसेनेला राजकारण चांगलं कळतं,'' असे राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT