Mumbai News : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून गोंधळ कायम आहे. रायगड, नाशिक जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना महायुती सरकारला खोचक टोला लगावला.
'मला पर्सनल लाइफबद्दल विचारा. पण मला महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून चाललेल्या गोंधळावर विचारू नका', असा टोला खासदार सुळे यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकार परिषदेत घेत राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले. निती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाकडे लक्ष वेधताना राज्याच्या ढासळलेल्या सामाजिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे, असे सांगून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्ला चढवला.
महायुती (Mahayuti) सरकारमध्ये पालकमंत्रीपदावर चाललेल्या गोंधळावर प्रश्न विचारताच, खासदार सुप्रिया सुळे यांनी हात जोडले अन् म्हणाल्या, "मला कोणतेही प्रश्न विचारा. पण मला पालकमंत्रीपदावरून प्रश्न विचारू नका. हात जोडून विनंती आहे. मला माझ्या पर्सनल लाईफचे प्रश्न विचारा. पण पालकमंत्र्यांवर विचारू नका. मला या विषयाचा अभ्यास कमी आहे".
'तसेच, ते पद संविधानिक आहे की, नाही यावर स्वतंत्र बोलू. पण या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार तसंच 'फिक्सल'चे खूप मोठं आव्हान आहे. संतोषला अजूनही न्याय मिळाला नाही. त्यातला एक खुनी फरार आहे. सोमनाथचा कोठडीत मृत्यू झाला आहे. एवढी भयानक परिस्थिती असताना, सरकारमध्ये पालकमंत्रीपदाबाबत वाद-विवाद होत असतील, खरंच बाबा 'रामकृष्ण हरी'. या प्रश्नाबाबत, मी दिलगिरी व्यक्त करते, या प्रश्नाचं उत्तर देणे अशक्य आहे', असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी डिवचलं. "माझ्यामुळे 50 दिवस पक्षाची हेडलाईन होत असेल ना, मी नैतिकतेने म्हटले असते, हा माझा राजीनामा, मी पक्ष वाढवण्यासाठी इथं आलेली आहे. पक्षाला अडचणीत आणण्यासाठी नाही. मी एक पाऊल माग घेतले असते आणि 'दूध का दूध अन् पाणी का पाणी', मी केले असते", असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.