Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड याच्याबाबत केल्याने दाव्यानं खळबळ उडाली आहे.
'मी अजूनही सांगतो, धनंजय मुंडेंनी हत्या केली, असे मी म्हणत नाही. परंतु 100 टक्के सांगतो, वाल्मिक कराड हा याचा 'प्लॅनर' आहे. गेली दहा वर्षांतले जे काही खून झाले आहेत, ते 80 टक्के खून हे वाल्मिक कराड याने 'प्लॅनिंग' करून केले आहेत', असा दावा करत आमदार आव्हाड यांनी खळबळ उडवून दिली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बीडमधील (BEED) गुन्हेगारीविषयी आणि वाल्मिक कराड याच्या दहशतीवर भाष्य केले. "संतोष देशमुख यांची हत्या सर्वसामान्यांना सरकारविषयी चीड आणणारी आहे. यातून सरकारची बदनामी होत आहे. असे असताना यात काहींना वाचवण्यात येत आहे, हे घृणास्पद आहे", असा घणाघात आमदार आव्हाड यांनी केला.
आमदार आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ते म्हणाले, "मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत नाही. याबाबत सीएम देवेंद्र फडणवीस यांना विचारा. या प्रकरणात फक्त सरकारची बदनामी होत आहे. सर्वसामान्यांच्या मनात, हत्येबद्दल प्रचंड चीड आहे. एवढी घृणास्पद प्रकारानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे".
'मी अजूनही सांगतो धनंजय मुंडेंनी हत्या केली, असे मी म्हणत नाही. परंतु 100 टक्के सांगतो, याचा 'प्लॅनर' हा वाल्मिक कराड आहे. गेली 10 वर्षांतले जे काही खून झाले आहे, त्यातील 80 टक्के खून हे वाल्मिक कराड याने 'प्लॅनिंग' करून केले आहेत. तो 'विकृत' आहे. तो 'सायकोपॅथ' आहे. तो 'सीरियल किलर' आहे', असा खळबळजनक दावा आमदार आव्हाड यांनी केला.
'मी एक एफआयर पाठवली आहे. त्यात वाल्मिक कराड आरोपी आहे. परळीतून बदली झालेले पोलिस निरीक्षक महाजन यांनी त्याला आजपर्यंत अटक केलेली नाही. का केली नाही? का मोकळं सोडलं होते. हेच महाजन आता केजला होते. त्यांच्याच काळात लफडं झालं. हे सांगताना आव्हाड यांनी स्वतः तक्रार देताना आलेला अनुभव सांगितला.
पोलिस निरीक्षक खेडकर यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेलो होतो. मला हो म्हणाले. मी गेलो. तेथून बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना बोलावून खेडकर यांनी आम्ही काय साहेबांची नावं घेणार नाही. तक्रार करायची असेल, तर करा. हे असं आहे बीड! मी स्वतः उपस्थित असताना त्यानं टरकावून लावलं. तिथं पोलिसांची दादागिरी आणि हातमिळवी आहे, असा देखील आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.