Mahesh Tapase NCP Sarkarnama
मुंबई

'भाजपने राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला!'

भाजपचे (Bjp) खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपच्या (Bjp) खांद्यावर बसून हिंदुत्वाची झेप घेण्याचे स्वप्न पाहणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरेंना (Raj Thackeray) भाजपच्याच उत्तरप्रदेशातील खासदाराने अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा टप्प्यात कार्यक्रम केला असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. (Mahesh Tapase criticizes Raj Thackeray)

भाजपचे खासदार ब्रिज भूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत येण्यास मज्जाव केला आहे. पहिल्यांदा हिंदी भाषिकांची माफी मागा तरच अयोध्येत या असे म्हटले आहे. त्यामुळे शेवटी कर्माची फळे प्रत्येकाला तिथेच भोगावे लागतात, अशी टीकाही तपासे यांनी केली.

राज ठाकरे यांची हिंदुत्वाची पतंग उडण्याअगोदरच भाजपकडून कन्नीकट करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी जे कल्याण रेल्वेस्थानकावर उत्तर भारतीय विद्यार्थ्यांसोबत आणि मुंबईतील टॅक्सी चालकांबाबत केले त्याची फळे आज त्यांना अयोध्या दौऱ्याच्या निमित्ताने भोगावी लागत आहेत ही वस्तुस्थिती आहे, असेही तपासे म्हणाले.

भाजप युज अँड थ्रो या तत्त्वावर चालणारा एक महान पक्ष आहे. आपल्याला उपयोग असेपर्यंत वापर करायचा त्यानंतर केराची टोपली दाखवायची ही भाजपची जुनी रणनीती आहे. आज भोंग्यांच्या विषयावर विश्व हिंदू परिषदेने हात झटकल्यानंतर अयोध्याचे खासदार ब्रिज भूषण सिंह यांची घोषणा म्हणजे राज ठाकरेंच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, असेही तपासे यांनी स्पष्ट केले.

ज्या योगींचे गुणगान राज ठाकरेंनी केले ते मुख्यमंत्री योगी उत्तरप्रदेशच्या जनतेच्या मनाविरुद्ध राज ठाकरेंना भेटतील का? असा सवालही तपासे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT