Jayant Patil News Sarkarnama
मुंबई

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या विधानपरिषद गटनेतेपदी मुख्यमंत्री शिंदेंचे नाव; जयंत पाटील म्हणतात माझेही पद धोक्यात...

Budget session News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

सरकारनामा ब्यूरो

Eknath Khadse News : विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) गटनेते म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नियुक्ती केली आहे. तर प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, यामध्ये विधीमंडळाकडून गंभीर चूक झाली. ती चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली.

राष्ट्रवादीने विधानपरिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे यांची नेमणूक करावी, असे पत्र विधान परिषदेच्या उपसभापतींना पाठवले होते. मात्र, विधान परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये खडसे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदेंच नाव आढळून आल्याने जयंत पाटलांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले.

जयंत पाटील या वेळी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल तर देशाचे पंतप्रधानच बदले आहेत. मुर्मू मॅडम देशाच्या पंतप्रधान आहेत, असे म्हटले होते, असा चिमटा मुख्यमंत्र्यांना जयंत पाटील यांनी काढला. तसेच, एकनाथ शिंदे यांची आता राष्ट्रवादीच्याही विधीमंडळ गटनेते पदावर नेमणूक व्हावी, अशी इच्छा दिसते आहे, असा टोला लगावला.

१० मार्चला एक पत्रक निधाले आहे. त्या पत्रात असे म्हटले आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते पद रिक्त आहे. त्यामुळे त्या पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात येत. हे पत्र जयंत पाटील यांनी विधानसभेत वाचून दाखवले. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. माझ्याकडे हे पत्र आहे. ते पत्र वेबसाईटवर आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.

माझ्याकडे राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते पद आहे, तेही पद आता धोक्यात आले आहे. असे वाटायला लागले आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. तसेच नागालॅंडमध्ये तेथील मुख्यमंत्र्यांना सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्याच प्रमाणे येथेही ती पद्धत एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे का? असे जयंत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT