Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News: राहुल गांधींच्या शिक्षेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

Sharad Pawar On Rahul Gandhi Case: पवारांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

NCP Sharad Pawar Reaction: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने त्यांना काल (गुरुवारी) दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभर जेलभरो आंदोलन करण्याच इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

राहुल गांधी यांच्या शिक्षेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करुन प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. राहुल यांना तुरूंगवासाची शिक्षा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काल (गुरुवार) शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सार्‍या विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक देखील घेतली आहे.राहुल गांधींचे प्रकरण राष्ट्रवादीचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्या प्रकरणासारखे आहे. सध्या देशात असलेल्या या राजकीय स्थितीचा त्यांनी निषेध केला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवलं असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.या विरोधात उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यासाठी न्यायालयाने ३० दिवसांची शिक्षाही स्थगित केली आहे. तसेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे.

सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावावरून’ तिरकस टिप्पणी केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यांना २ वर्षे तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला तसेच शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी..

१३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकात एका निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले होते, ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्यात एक गोष्ट समान आहे. सर्वच चोरांची आडनावे मोदीच कशी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT