Ajit Pawar |
Ajit Pawar | Sarkarnama
मुंबई

शिक्षक अन् पदवीधरसाठी आघाडीचे जागावाटप ठरलं; अजितदादांची मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : राज्यातील शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) तर नाशिक पदवीधरची जागा काँग्रेस (Congress) लढणार आहे. कोकण शिक्षक मतदार संघाची जागा शेकापलाचं मिळणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसांचे अधिवेशन शिर्डीमध्ये सुरु आहे. अधिवेशनात बोलताना अजित पवार यांनी ही माहिती दिली. तर नागपूर शिक्षक मतदार संघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघाच्या जागेबाबत देखील लवकरच महाविकास आघाडीची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

नागपूर आणि अमरावतीसाठी आपल्याकडे उमेदवार तयार आहे. मात्र, मिञ पक्षांसोबत चर्चा करुनच निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षकेत्तर मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

शिक्षक किंवा पदवीधरांच्या मतदार संघांमध्ये राजकीय घुसखोरीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असताना पुढल्या वर्षी होणाऱ्या विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

पदवीधर व शिक्षकांची नव्याने नोंदणी होणार आहे. २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारणार येणार आहे. ता. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT