NCP-women-wing
NCP-women-wing 
मुंबई

 मुंबईत मातोश्रीबाहेर राष्ट्रवादीच्या रणरागिणी आक्रमक

सरकारनामा

मुंबई :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ आज 'मातोश्री'बाहेर मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

मुंबई राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आणि 'मुंबई युवती'च्या अध्यक्षा अदिती नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शरद पवार हे देशाचे नेते असून, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचे आहे. त्यामुळे ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी पेडणेकर यांनी केली.

 शरद पवारसाहेबांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी त्यांना नी कॅप आणि प्रतिकात्मक वाघ भेट देवून निषेध केला.

शरद पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नावाचा मोठा वटवृक्ष उभा केला आहे. तर उध्दव ठाकरे यांना शिवसेना वारसा हक्काने मिळाली आहे मात्र त्यांना तीही नीट चालवता येत नाही, असा टोला मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे यांनी लगावला.

शिवाय उध्दव ठाकरे यांचा गुडघ्यातील मेंदू शाबूत रहावा यासाठी आम्ही त्यांना नी कॅप दिली आणि त्यांच्या शिवसेनेच्या वाघाचे सध्या मांजर झाले असून तो वाघ पुन्हा शाबूत रहावा म्हणून प्रतिकात्मक वाघ भेट दिल्याची माहिती अदिती नलावडे यांनी दिली.

या आंदोलनामध्ये उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा बिलकिश आपा, सुरेना मल्होत्रा, डॉ.रिना मोकल, अनिता थोरात, स्वाती माने, युवक तालुकाध्यक्ष राकेश धिलोड आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT