Lalbaugcha Raja Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Viral Note: लालबाग राजाच्या चरणी अजितदादांच्या कार्यकर्त्याने ठेवलेली 'ती' चिठ्ठी व्हायरल; अजितदादांना लवकरात लवकर...

Lalbaugcha Raja Ajit Pawar News : अजितदादांनी लालबाग राजाच्या चरणी नारळाचे तोरण वाहिलं.

Mangesh Mahale

Mumbai : राज्यभरातील गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मुंबईतील लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांसह नेते, सेलिब्रिटींची गर्दी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवारी) लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या कार्यकर्त्याने गणरायाच्या चरणी ठेवलेल्या चिठ्ठीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

अजितदादांसोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे, कार्यकर्ते होते. अजितदादांनी लालबाग राजाच्या चरणी नारळाचे तोरण वाहिलं. या वेळी एका कार्यकर्त्याने गणरायाच्या चरणी एक चिठ्ठी ठेवली. रणजित नरोटे यांनी या चिठ्ठीत 'हे लालबागच्या राजा आमचे अजितदादा पवार लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होऊ दे' असा मजकूर लिहिला आहे.

राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत या चिठ्ठीमुळे अजितदादा मुख्यमंत्री होणार, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. ही चिठ्ठी सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. अजितदादांनी सिद्धिविनायक गणपतीचेही दर्शन घेतले.

यापूर्वीही अजित पवार यांचे "भावी मुख्यमंत्री" असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले होते. यावर अजितदादांनी अनेक वेळा स्पष्टीकरण करीत असे बॅनर लावू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे "भावी मुख्यमंत्री" असे बॅनर लागले होते.

त्यावर अजित पवार म्हणाले, "कार्यकर्त्यांना मी मागे सांगितले होते की असे बॅनर लावू नका, कारण असे बॅनर लावून काहीही उपयोग नाही. केवळ कार्यकर्त्यांना समाधान मिळते. अशा प्रकारचे बॅनर कोणी लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी मॅजिक फिगर १४५ चा आकडा गाठावा लागतो. नाहीतर मुख्यमंत्री व्हायचं हे केवळ दिवा स्वप्नच राहते."

गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांसारख्या नेत्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावली होती. उद्योगपती मुकेश अंबानी, 'किंगखान' शाहरुख खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी गणरायाचे दर्शन घेतले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT