Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: युतीत वादाची ठिणगी ? मुंबई समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीला डावललं

BJP - Shivsena-NCP : भाजप-शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीला (अजित पवार गट) निमंत्रणच नसल्याची माहिती समोर आली आहे.

Ganesh Thombare

Mumbai News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारमधील सर्वच विभागांमध्ये हस्तक्षेप वाढत असल्याने शिंदे गटासह भाजपच्या काही मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर आता भाजप-शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीला (अजित पवार गट) निमंत्रणच नसल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजप-शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीची रविवारी मुंबईत गरवारे क्लब या ठिकाणी महत्वाची बैठक झाली. या बैठकीला मुंबईचे दोन्ही पालकमंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. या बैठकीतील युतीच्या नेत्यांनी आपआपसात समन्वय ठेवून कार्यक्रम घ्यावे, तसेच सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

पण या बैठकीला राष्ट्रवादीला निमंत्रण नसल्याने राज्याच्या राजकारणात आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे ना ? याबद्दल आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. असे असले तरी या बैठकीसंदर्भात अद्याप कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रशासनाच्या बैठका घेतल्या होत्या. पण पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत, असे असतानाही अजित पवार हे सुपर पालकमंत्री असल्यासारखे बैठका घेत होते. त्यामुळे भाजपच्या काही नेत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त असल्याचे सांगण्यात येत होते.

यातच काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत आले होते. शाहांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, अजित पवार गैरहजर होते.

याचवेळी अमित शाहांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सागर बंगल्यावर बंद दाराआड तब्बल ४५ मिनिटांपेक्षा जास्त चर्चा केली होती. या चर्चेलाही अजित पवार नव्हते.

यानंतर आता भाजप-शिवसेना युतीच्या मुंबई समन्वय समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीला (अजित पवार गट) निमंत्रणच नसल्याची माहिती समोर आल्यामुळे युतीमध्ये सर्व काही आलबेल आहे ना ? याबद्दल आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT