Sharad Pawar, Ajit Pawar sarkarnama
मुंबई

NCP MLAs Meets Sharad Pawar: NCP चे फुटलेले मंत्री, आमदार अजित पवारांसह पुन्हा शरद पवारांकडे ; या भेटीत काय ठरणार ?

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट

सरकारनामा ब्युरो

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सर्व आमदार, मंत्री पुन्हा आज शरद पवार यांच्या भेटीला वाय.बी. सेंटर येथे गेले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी काल (सोमवारी) अजित पवार यांनी आपल्या आठ मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली होती.

त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार गट पवारांच्या भेटीसाठी गेल्याने राज्याच्या राजकारणात नवीन ट्वीस्ट आला आहे. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर शरद पवारांवर टीका करताना अजित पवारांनी त्यांचं वयही बाहेर काढलं होतं, तर शरद पवारांनी त्यांचा फोटो वापरण्यासही मज्जाव केला.

या दोन्ही मोठ्या नेत्यांचं नाराजीनाट्य टोकाला पोहोचलेलं असताना आता अजित पवार त्यांच्या इतर बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता आहे.

कालच्या भेटीत पवार यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. 'राष्ट्रवादी पक्ष एकत्र राहावा, अशी विनंती शरद पवारांना केली, असे प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT