BJP candidate Neel Somaiya after filing his nomination for the Mumbai civic election from Ward 107, where his unopposed victory now appears certain. Sarkarnama
मुंबई

BMC Election 2026 : 'नील तू उद्धव काकांना डोळा मारला होता का? मुलाच्या एकतर्फी विजयाची खात्री होताच, किरीट सोमय्यांनी ठाकरेंना डिवचलं...

Neel Somaiya Unopposed Win : मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107 मधून नील सोमय्या यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या वॉर्डात हंसराज दानानी यांना उमेदवारी दिली होती. तर ठाकरे बंधुंनी पवारांच्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 04 Jan : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या भाजपकडून दुसऱ्यांदा महापालिकेची निवडणूक लढवत आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 107 मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अशातच आता या वॉर्डमधून नील यांचा एकतर्फी विजयाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. कारण या वॉर्डातून विरोधी पक्षाने उमेदवार दिला नसल्यामुळे आता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या वॉर्डात हंसराज दानानी यांना उमेदवारी दिली होती.

मात्र, त्याचा अर्ज बाद झाला आहे. शिवाय या वॉर्डमध्ये ठाकरे बंधुंनी पवारांच्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. कारण ही ठाकरे आणि पवारांच्या आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली होती.

तर आता पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने नील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, मुलाच्या बिनविरोध निवडीवर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.

ते म्हणाले, 'मी नीलला विचारलं तू काय उद्धव काकांना डोळा मारला होता का? तर या वॉर्डमध्ये महाविकास आघाडीचा एकही उमेदवार टिकला नाही. 16 तारखेला महाविकास आघाडीतील सर्व पक्ष संपलेले असतील', असंही ते सोमय्या म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT