मुंबई

नीलम गोऱ्हे होणार विधान परिषदेच्या उपसभापती

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई : शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेतील आमदार नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या सभापती होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

गेल्या अधिवेशनात विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. तेव्हांच गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा होती. आता गोऱ्हे यांना विधान परिषदेत संधी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभ्यासू नेत्या म्हणून गोऱ्हे या परिचित आहेत. शिवसेनेची बाजू त्या प्रसारमाध्यमांत प्रभावीपणे मांडतात. 

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे विधान परिषदेत बहुमत असल्याने त्यांची नियुक्ती सहज होऊ शकते. गोऱ्हे यांना उपसभापती करतानाच विद्यमान सभापती रामराजे निंबाळकर यांच्यावर सत्ताधारी पक्ष अविश्वास ठराव आणणार का, याची आता उत्सुकता आहे. त्यांच्यावर तसा ठराव आणणार असल्याची घोषणा सभागृह नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT