eknath shinde | kailash shinde | rahul gethe sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : CM शिंदेंची 'ऑर्डर' धडकली अन् कमिश्नर कैलाश शिंदे, राहुल गेठेंनी पब, बारचा काढला 'धूर'

Akshay Sabale

पुण्यातील ड्रग्ज प्रकरण उघड होतात शिंदे-फडणवीस-पवार सरकारची झोप उडाली असून, आता अख्खा महाराष्ट्र 'ड्रग्ज फ्री' करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून बेकायदा पब, बारवर थेट बुलडोझर चालविण्याचा पवित्रा घेतला आहे.

नवी मुंबईत काही महिन्यांपूर्वी अशा पब, बारवरील थांबवलेली कारवाई करण्याचा आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी दिला. त्यानंतर रातोरात नवी मुंबई महापालिकेचे कमिश्नर कैलास शिंदे, अतिक्रम विभागाचे राहुल गेठे यांनी बेलापूर, कोपरखैरणेतील आलिशान पब आणि बारवर हातोडा चालवला.

या कारवाईमुळे पब, बार चालकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईनंतर कैलाश शिंदे आणि राहुल गेटेंनी नवी यादी करून पुन्हा अशाच प्रकारची कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नवी मुंबई आणि परिसरातील पब, बारमधून तोडफोडीच्या कारवाई धूर निघणार हे नक्की.

पुण्यातील ड्रग्ज प्रकरण चर्चेत आले आहेत. त्याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले आहेत. पुण्यासह मुंबई, नवी मुंबई आणि काही मोठ्या शहरांमध्ये ड्रग्ज रॅकेट असल्याचा संशय आहे. ही बाब गांभीर्यानं घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनी आता 'ड्रग्ज फ्री स्टेट' मोहीम राबविण्याची भूमिका हाती घेतली आहे. त्यातून मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे परिसरातील बेकायदा बार, पबला 'टार्गेट' केलं जाणार आहे. त्यानुसार स्थानिक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांना 'अलर्ट' राहून बार आणि पब तोडण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत.

नवी मुंबई महापालिका परिसरातील पाम बीच, कोपरखैरणे, तुर्भे आणि अन्य काही ठिकाणी बेकायदा पब आणि बार असल्याची माहिती महापालिका आणि पोलिसांकडून होती. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि पब, बार मालकांच्या मनगटशाहीमुळे कारवाई होऊ शकली नव्हती.

काही महिन्यांपूर्वी या भागांतील काही हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर बार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे गाऱ्हाणं मांडून कारवाई थांबवली होती. मग, पुन्हा पब, बारवर अतिक्रमणे थाटण्यात आली. आता मुख्यमंत्र्यांच्याच आदेशानं पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील काही दिवस कारवाईचा हा सिलसिला सुरूच राहणार असून त्यासाठी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि अतिक्रमण विभागाचे राहुल गेठे 'फिल्ड'वर उतरले आहेत. या भागातील कारवाईसाठी तब्बल 200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, त्यासह महापालिकेचे शे-सव्वाशे अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT